मुंबईतील सात रेल्वे स्थानकांसह राज्यातील अन्य रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार – ७७६ कोटींची तरतूद
मुंबई दि.०६ :- मुंबईतील सात रेल्वे स्थानकांसह राज्यातील एकण १८ स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी ७७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
भारतीय नौदलाची ‘टी-८०’युध्दनौका खाडी किनारी दाखल
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली दादर आणि राज्यातील शिवाजीनगर, साईनगर शिर्डी, लोणावळा, नाशिक रोड, अकोला, अमरावती, भुसावळ, मिरज, वर्धा, नांदेड या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील स्थानकासाठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास येत्या सहा महिन्यांत पूर्ण केला जाणार आहे.