बृहन्मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या लता मंगेशकर स्मारकाचे ताडदेव येथे भूमिपूजन
सागरी महामार्गाला लता मंगेशकर यांचे नाव देण्याची मागणी
मुंबई दि.०६ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत उभारण्यात येणा-या लता मंगेशकर नियोजित स्मारकाचे भूमिपूजन आज ताडदेव येथे करण्यात आले. हे स्मारक मुंबईमधील हाजी अली चौक येथे उभारण्यात येणार आहे.
मुंबईतील सात रेल्वे स्थानकांसह राज्यातील अन्य रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार – ७७६ कोटींची तरतूद
लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमास उषा मंगेशकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. लता दीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले याचा आनंद आहे.
भारतीय नौदलाची ‘टी-८०’युध्दनौका खाडी किनारी दाखल
मुंबईत बांधल्या जाणाऱ्या सागरी किनारा महामार्गाला लतादीदींचे नाव देण्यात याव, अशी आमची राज्य शासनाला विनंती असल्याचे उषा मंगेशकर यावेळी म्हणाल्या. या स्मारकासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केली असून येत्या सहा महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे.