वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी बैठक आयोजित करावी
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी
मुंबई दि.०६ :- वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच बैठक आयोजित करावी आणि कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करावी- राज ठाकरे
उर्जा विभागातील कंत्राटी कामगारांच्या अनेक गंभीर समस्यां सोडविण्यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न वीज कंत्राटी कामगार संघ प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि आता उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही चर्चेसाठी वेळ दिला जात नसल्याचे खरात, मेंगाळे यांनी म्हटले आहे.
आरे वसाहतीतील आदिवासींचा उद्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
महाविकास आघाडी सरकारने पुर्णपणे निष्क्रियता दाखविल्यामुळे कंत्राटी कामगारांचे प्रश्न प्रलंबितच राहीले. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री फडणवीस यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार फडणवीस यांनी लवकरात लवकर बैठक बोलवावी, असे आवाहन खरात, मेंगाळे यांनी केले आहे.