राजकीय

विद्यमान लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करावी- राज ठाकरे

मुंबई दि.०५ :- एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एका पत्राद्वारे व्यक्त केले आहे. पिंपरी – चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी रविवारी सर्वपक्षीय नेत्यांना एका पत्राच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे.

आरे वसाहतीतील आदिवासींचा उद्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पोटनिवडणुकीत पक्षाने त्या मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही, असेही ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

राजभवन येथील चित्रकला कार्यशाळेला राज्यपालांची भेट

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन आपण केले होते. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा, असेही ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *