डोंबिवली ब्राह्मण उद्योजक समूहाच्या व्यावसायिक डिरेक्टरीचे प्रकाशन
डोंबिवली दि.०६ :- डोंबिवलीतील ब्राह्मण उद्योजक समूहाच्या पहिल्या’व्यावसायिक डिरेक्टरी’ चे प्रकाशन रविवारी डोंबिवलीत झाले. ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी बैठक आयोजित करावी
डॉ. कोल्हटकर यांनी मनोगत व्यक्त करताना चार्वाक, चाणक्य ते तुकोबांच्या अभंगांचे दाखले दिले. तसेच व्यवसाय आणि व्यवसायाची तात्विक बैठक, धाडस, सातत्य, कल्पकता यावर विवेचन केले.
विद्यमान लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करावी- राज ठाकरे
या डिरेक्टरीच्या प्रती विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे. स्थानिक लघु, मध्यम उद्योजकांना याचा फायदा होईल आणि नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
डिरेक्टरीसाठी संपर्क ९८३३०८७६७३ किंवा ९८१९१२७७७७