‘एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार
राज्य शासनाचा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई, दि. ३१
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘एमपीएससी’चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून ‘एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम तत्काळ लागू करू नये, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान, आज (३१ जानेवारी) पुण्यात पुन्हा एकदा विद्यार्थी रस्त्यावर उतरले. भाजपचे नेते गोपीचंद पडळकरही या आंदोलनात सहभागी झाले होते.
ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे उद्या डोंबिवलीत व्याख्यान
पडळकर यांनी आंदोलक विद्यार्थी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रमणध्वनीवर चर्चा करवून दिली. त्यावेळी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यानंतर ‘एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सकल हिंदू समाजातर्फे मुंबईत भव्य मोर्चा – लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी