Sunday, December 14, 2025
Latest:
अर्थ उद्योग

ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे उद्या डोंबिवलीत व्याख्यान

– केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाषणाचा नवा विक्रम

अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाचे सलग ३६ वे वर्ष

डोंबिवली, दि. ३१
डोंबिवली आसपास प्रतिनिधी
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ञ आणि ललित लेखक चंद्रशेखर टिळक १९८८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण करत आहेत. अर्थसंकल्पावरील त्यांच्या सलग व्याख्यानाचे यंदा ३६ वे वर्ष असून तो एक नवा विक्रम ठरणार आहे. उद्या ( बुधवार) संध्याकाळी सात वाजाता डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर शाळेच्या मैदानात टिळक यांचे अर्थसंकल्पीय विश्लेषण/व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाने टिळक हे दिवंगत नानी पालखीवाला यांचा विक्रम पार करणार आहेत. एका व्यक्तीने आर्थिक विषयावर , सलग ३६ वर्षे बोलणें हा कदाचित विश्वविक्रमही ठरू शकेल.

अदानी समुहातील गैरकारभाराची स्वतंत्र तपास ‘एसआयटी’मार्फत करावी- नाना पटोले

दिवंगत नानी पालखीवाला यांनी एकूण ३५ वर्षे श्रोत्यांच्या प्रचंड उपस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान दिले. १९९४ पर्यन्त सूरू असलेल्या या परंपरेची सुरूवात १९५० च्या दशकात एका हॉटेलमधील छोट्या सभागृहापासून झाली. आणि नंतर उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होऊ लागला. पालखीवाला यांचे केंद्रीय अर्थसंकल्पावरील हे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकणे ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी असायची.

मालाड येथील एका उद्यानाला दिलेले ‘टिपू सुलतान’ नाव काढून टाकण्याचे आदेश

नानी पालखीवाला यांच्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पावर सलग व्याख्यान देणारे वक्ते म्हणून आता चंद्रशेखर टिळक यांचे नाव घेतले जाते.‌ अर्थसंकल्पीय विश्लेषण, नानी पालखीवाला आणि चंद्रशेखर टिळक असा विचार करत असताना लक्षात येणारी गोष्ट म्हणजे नानी पालखीवाला हे एकूण ३५ वर्षे अर्थसंकल्पावर बोलले असले तरी ते सलग ३५ वर्षे बोललेले नाहीत. ते जेंव्हा दोन वर्ष भारताचे अमेरिकेत राजदूत होते तेंव्हा त्यात दोन वर्षांचा खंड पडला आहे.

‘डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करणार्‍या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे

चंद्रशेखर टिळक मात्र गेली ३६ वर्षे ( २०२३ हे ३६ वे वर्ष ) सलगपणे अर्थसंकल्पीय विश्लेषण करत आहेत. पालखीवाला यांचे व्याख्यान हे फक्त इंग्रजीतच असायचे. टिळक हे मराठी, हिंदी, इंग्रजी ( सुरुवातीची काही वर्षे गुजराती आणि उर्दू मध्येही ) अशा वेगवेगळ्या भाषांत विवेचन करत असतात.

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले ‘संस्कृत राजभाषा व्हावी’

आर्थिक विषयांवर सुमारे ३ हजार ४८० भाषणे, सर्व विषय मिळून एकूण ४ हजार ५०० भाषणे, सुमारे ३ हजार लेख ,२७ पुस्तके आणि विविध पुरस्कार आजवर टिळक यांना मिळाले आहेत.. येत्या १ फेब्रुवारीला होणा-या टिळक यांच्या व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *