‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपटाच्या टीझरचे अनावरण
मुंबई, दि. ३१
प्रसिद्ध धावपटू ‘ललिता शिवाजी बाबर’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या टिझरचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ललिता शिवाजी बाबर, अभिनेत्री अमृता खानविलकर, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर, एंडेमॉल शाईन इंडियाचे गौरव गोखले आदि उपस्थित होते.
मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्यामळे आध्यात्मिक प्रगतीला चालना
यावेळी ललिता शिवाजी बाबर कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथवर पोहोचले आहे. माझा इथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
चित्रपटात ‘ललिता शिवाजी बाबर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी आनंदाचा, गौरवाचा क्षण असल्याची भावना अमृता खानविलकर यांनी व्यक्त केली.
उषा उत्थुप, कैलास खेर, महेश काळे यांच्या बहारदार अदाकारीने रंगणार शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे उद्या डोंबिवलीत व्याख्यान