मुंबई- सोलापूर आणि मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
मुंबई दि.३० :- मुंबई- सोलापूर आणि मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस या दोन नव्या रेल्वेगाड्या मध्य रेल्वेवर सुरू होत आहेत. साईनगर शिर्डी आणि सोलापूर (सिद्धेश्वर मंदिर) या धर्मिक स्थळांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविण्याची शक्यता आहे. येत्या १० फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता पंतप्रधानांनी झेंडा दाखविल्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीसाठी आणि सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ४.१० ला सुटेल आणि सोलापूरला रात्री १०.४० ला पोहोचेल.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यालयांच्या विकासासाठी प्रयत्न करणार रामदास आठवले
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बुधवार तर सोलापूरहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही एक्स्प्रेस धावणार आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबई-सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी सुमारे ७ तास ५५ मिनिटे लागतात. ‘वंदे भारत’ने हा प्रवास सहा तास ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डवाडी येथे थांबा देण्यात आला आहे.
सकल हिंदू समाजातर्फे मुंबईत भव्य मोर्चा – लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नियमितपणे सकाळी ६.१५ वाजता रवाना होणार असून शिर्डीत दुपारी १२.१० वाजता पोहोचणार आहे. शिर्डी येथून ही गाडी संध्याकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ११.१८ला पोहोचेल. सध्या धावत असलेल्या शिर्डी एक्स्प्रेसला सहा तासांचा अवधी लागतो. नव्या गाडीने पाच तास ५५ मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे. मंगळवार वगळता उर्वरित सर्व दिवस शिर्डी ‘वंदे भारत’ चालविण्यात येणार आहे.