पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यालयांच्या विकासासाठी प्रयत्न करणार रामदास आठवले
बेलापूर दि.२९ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे काम कोणतेही मतभेद न बाळगता एकजुटीने करावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यालयांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
सकल हिंदू समाजातर्फे मुंबईत भव्य मोर्चा – लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी
बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्यवर्ती शाळेच्या ४२ व्या वार्षिक संमेलनात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात; जी एस टी आयुक्त रवींद्र बांगर, प्राचार्य बी बी पवार आदी उपस्थित होते.
राज्य सरकारकडून बेलापूर मध्यवर्ती विद्यालयाच्या पुनर्विकासासाठी ४ कोटी ५० लाख आणि नवीन विद्यालय इमारतीसाठी १४ कोटी मंजूर झाले असून त्याचे काम लवकर सुरू होईल.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रचार आज संपला
बेलापूरमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सिडको कडून ५ एकर जमीन मिळवून भव्य शिक्षण संकुल उभारून मागासवर्गीय विद्यर्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय ; बिझिनेस मॅनेजमेंट सारख्या विद्याशाखांचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही आठवले यांनी सांगितले.