ठळक बातम्या

सकल हिंदू समाजातर्फे मुंबईत भव्य मोर्चा – लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी

मुंबई दि.२८ :- लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

मुंबईत दोन दिवस थंडीचे

शिवाजी पार्क मैदान, दादर येथून मोर्चला सुरूवात झाली. मुंबईतील हिंदू बांधवांची ताकद एकत्र रस्त्यावर उतरावी. तसेच, हिंदू म्हणून एकत्र येत मोर्चातून समाजाला महत्वाचा संदेश द्यावा, या उद्देशाने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते. मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रचार आज संपला

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आणि अन्य हिंदू संघटनांचे नेतेही सहभागी झाले होते. परळ येथील कामगार मैदानावर मोर्चचा समारोप झाला. दरम्यान विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजातर्फेही आज मुंबईत आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *