फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू
मुंबई दि.२८ :- गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने यासाठी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला परवानगी दिली. सोमवारी ते शुक्रवारदरम्यान सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी फेरी सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
अदानी समुहातील गैरकारभाराची स्वतंत्र तपास ‘एसआयटी’मार्फत करावी- नाना पटोले
या सेवेमुळे ६० मिनिटांत प्रवास शक्य होणार आहे. २०० प्रवासी क्षमतेची देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नोव्हेंबर २०२२ पासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडव्यादरम्यान सुरू झाली. सातही दिवस तीन-तीन अशा एकूण सहा फेऱ्या (मुंबई – मांडवा तीन आणि मांडवा – मुंबई तीन) सुरू झाल्या.
मुंबई १ कार्डद्वारे ‘बेस्ट’ बसचेही तिकीट काढता येणार
मात्र प्रतिसादाअभावी काही दिवसांतच, डिसेंबर २०२२ मध्ये सोमवार ते शुक्रवारदरम्यान ही टॅक्सी पूर्णत: बंद करण्याची वेळ कंपनीवर ओढवली.
सध्या केवळ शनिवार आणि रविवारी मांडवा – मुंबई क्रूझ टर्मिनल आणि मांडवा ते बेलापूरमार्गे मुंबई क्रुझ टर्मिनल अशी सेवा सुरू ठेवली.