दंडात्मक भाडे, नुकसानीच्या शुल्काची रक्कम वसूल न करण्याचे आदेश
मुंबई दि.२८ :- कलिना येथील सेवा निवासस्थान रिक्त न करणाऱ्या कर्मचार्यांच्या वेतनातून पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच २२ फेब्रुवारीपर्यंत दंडात्मक भाडे आणि नुकसानीच्या शुल्काची रक्कम वसूल करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने एअर इंडियाला दिले आहेत.
अदानी समुहातील गैरकारभाराची स्वतंत्र तपास ‘एसआयटी’मार्फत करावी- नाना पटोले
दंडात्मक भाडे आणि नुकसानीच्या शुल्काची रक्कम वेतनातून कपात करण्याबाबत एअर इंडियाने बजावलेल्या नोटिशीविरोधात तीन कर्मचारी संघटनांनी न्यायालयात धाव घेऊन नोटिसीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दंडात्मक शुल्क आणि नुकसानीच्या शुल्काची रक्कम वसूल करण्याच्या नोटिसीवर पुढील सुनावणीपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश कंपनीला दिले.