पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी’ माहितीपट दाखविण्यास टाटा समाज विज्ञान संस्थेचा नकार
मुंबई दि.२८ :- पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट दाखविण्यास मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीस) ने नकार दिला आहे. संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखविल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा ‘टीस’ने दिला आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू
इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी मोंदीवरील हा माहितीपट संस्थेच्या प्रांगणात दाखविण्याची तयारी करत आहे. या माहितीपटावरून देशातील काही संस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थी अशा कोणत्याही कृतीत सहभागी झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दंडात्मक भाडे, नुकसानीच्या शुल्काची रक्कम वसूल न करण्याचे आदेश
संस्थेतील विद्यार्थ्यांनी असा कोणताही माहितीपट दाखविण्याची योजना आखलेली नाही. माहितीपटाबद्दल आम्हाला संस्था संचालकांकडून नियमावली मिळाली आहे, असे संस्थेतील विद्यार्थी संघटनेचा नेता प्रतीक परमे यांनी सांगितले.