क्रेनच्या हुकाचा फटका बसल्याने मोटरमन जखमी
मुंबई दि.२८ :- पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ विरार लोकल ट्रेनला क्रेनच्या हुकाचा फटका बसल्याने विरार लोकलचा मोटरमन गंभीर जखमी झाला.
मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून एम डी आरिफ असे जखमी मोटरमनचे नाव आहे. काल रात्री ही दूर्घटना घडली.
नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कामासाठी क्रेन उभी करण्यात आली आहे.
या क्रेनच्या हुकचा फटका येथून जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनच्या काचेला बसला. मोटरनमच्या केबीजवळ या क्रेनच्या हुकाचा फटका बसला. अपघातात मोटरमनच्या डोक्याला दुखापत झाली. .