ठळक बातम्या

कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या गजानन माने यांना ‘पद्मश्री’

डोंबिवली दि.२७ :- कल्याण येथील पत्रीपुलाजवळील हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीत गेली चाळीस वर्षे कुष्ठ शरुग्णांच्या विकासासाठी कार्य करणारे डोंबिवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त सैनिक गजानन माने यांना केंद्र शासनाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्याण, डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर कुष्ठरुग्ण भिक्षा मागून उपजीविका करत असल्याचे माने यांच्या निदर्शनास आले.

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुष्ठ रुग्णांसाठी त्यांच्या व्याधीवर उपचारा करणारा दवाखाना त्यांच्या भागात सुरू केला. त्यांना त्यांच्या वसाहतीत रोजगाराची साधने उपलब्ध करुन दिली. त्यांना स्वालंबनाने उभे केले तर कुष्ठरुग्ण भिक्षा मागण्यासाठी शहरातील रस्त्यांवर दिसणार नाहीत. असा विचार करुन गजानन माने यांनी पत्रीपुला जवळील हनुमाननगर कुष्ठ रुग्ण वसाहतीत १९९० मध्ये सामाजिक कार्याला सुरूवात केली.

ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह – व्याख्यान, कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांचे आयोजन

वसाहती मधील ४० तरुण मुलांना कल्याण डोंबिवली महापालिकेत कामाला लावले. महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. शासन, पालिकेच्या योजनेतून त्यांना शिवणयंत्र उपलब्ध करुन दिली. घराघरात मेणबत्त्या, पणत्या, अगरबत्ती सारखे हस्त कौशल्य व्यवसाय सुरू करुन दिले. या वस्तुंना बाजारपेठ मिळून दिली.

तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ ची नितांत आवश्यकता – संदीप वासलेकर

माने यांना कुष्ठ रुग्ण सेवेबद्दल पद्मश्री सन्मान द्यावा म्हणून माजी महापौर दिवंगत कल्याणी पाटील, उपमहापौर राहुल दामले यांच्या काळात महापालिकेने ठराव करुन तो शासनाकडे पाठविला होता. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी याचा पाठपुरावा
केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *