तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ ची नितांत आवश्यकता – संदीप वासलेकर
डोंबिवली दि.२७ :- युद्धामुळे मानवतेचा आणि संस्कृतीचा नाश होतो. त्यामुळे तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ ची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ या पुस्तकाचे लेखक, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचेस्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक आणि माजी डोंबिवलीकर संदीप वासलेकर यांनी येथे केले.
विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित मकरोत्सव २०२३ च्या प्रथम पुष्पात वासलेकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी वासलेकरांची मुलाखत घेतली. वासलेकर यांनी लिहिलेले ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानिमित्ताने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपच्या सहसंस्थपिका इल्मास फतेहाली या वेळी उपस्थित होत्या.
मुंबईसह राज्यात २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान थंडीची लाट, तुरळक पावसाची शक्यता
भविष्यात कोणत्या प्रकारचे युद्ध होईल, ते जैविक होईल की अण्वसत्रांचे असेल हे सांगणे अवघड आहे. पण जर तिसरे महायुद्ध झालेच तर संपूर्ण मानवजातीचा विनाश होऊ शकतो, असे सांगून वासलेकर म्हणाले, १९३ देशांपैकी जवळपास १७५ देशांना शांततामय वातावरण अर्थातच ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ हवे आहे. उर्वरीत देशांना शांततेची ही मानसिकता पटवून दिल्यावर ते अशक्य नाही. आणि त्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे.
सायबर टेक्नॅालॅाजीच्या सहाय्याने एखादे क्षेपणास्त्र पाठविले आणि हल्ला केला असा आभास निर्माण करता येईल. त्यामुळे हल्ला झालेला नसतानाही या आभासामुळे प्रतिहल्ला होऊ शकतो, असेही वासलेकर यांनी सांगितले. तीन युद्ध करून आमचीची वाताहत झाली आहे असे मत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केले. भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी पाचारण केले आहे. यातून काही चांगले घडेल अशी आशा करू या, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात वासलेकर म्हणाले