मुंबई १ कार्डद्वारे ‘बेस्ट’ बसचेही तिकीट काढता येणार
मुंबई दि.२७ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीतील (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) ‘मुंबई १’ कार्डद्वारे आता ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करता येणार आहे. या कार्डद्वारे मेट्रोबरोबरच बेस्ट बसचे तिकीटही काढता येणार आहे.
तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी ‘वर्ल्ड विदाऊट वॉर’ ची नितांत आवश्यकता – संदीप वासलेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी या कार्याचे लोकार्पण करण्यात आले. २० जानेवारीपासून ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेतील सर्व मेट्रो स्थानकांवर हे कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्या दिवशी, २० जानेवारी रोजी एक हजार ७८७ कार्डची विक्री झाली.
कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या गजानन माने यांना ‘पद्मश्री’
मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टसाठी एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली होती. गेली अनेक वर्षे या संदर्भात काम सुरू होते आणि अखेर ही जबाबदारी एमएमआरडीएने पूर्ण केली. एमएमआरडीएने ‘मुंबई १’ नावाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तयार केले आहे.