ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह – व्याख्यान, कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई दि.२७ :- ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे बोरिवली येथे येत्या ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत श्रीगुरुचरित्र पारायणाचा ४० वा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमही होणार आहेत. ओम सद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक, सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी गाणगापूर यात्रेनिमित्त होणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणाची सुरवात १९८४ साली केली होती. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी सहा वाजता सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्या ध्वनिमुद्रित आवाजातील श्रीगुरुचरित्राच्या अध्यायांचे पारायण होणार आहे.
मुंबईसह राज्यात २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान थंडीची लाट, तुरळक पावसाची शक्यता
दररोज संध्याकाळी लक्षार्चना, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन आणि संगीत सेवा असे विविध अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार ३१ जानेवारी रोजी लक्षार्चना, बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी प्राची गडकरी यांचे “देवाचिये द्वारी” या विषयावर व्याख्यान, गुरुवार २ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. वीणा खाडिलकर यांचे ‘संत परम हितकारी’ या विषयावर कीर्तन होणार आहे.
विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत दत्तयाग तर ४ फेब्रुवारी रोजी डॉ. पं. संदीप अवचट यांचे ‘शास्त्रामागचे विज्ञान’ या विषयावर व्याख्यान, रविवार ५ फेब्रुवारी रोजी प पु गुळवणी महाराज यांचे शिष्य कानडे गुरुजी यांचे ‘भारतीय कालगणना’ या विषयावर प्रवचन, सोमवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ‘मिलन सप्तसुरांचे – भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची सोमवारी मुंबईत बैठक
उत्सवाचे कार्यक्रम ओम सद्गुरू प्रतिष्ठान, ए/८, दौलत नगर रस्ता क्र. ७, प प टेम्बेस्वामी महाराज चौक, नवनीत रुग्णालयाशेजारी, बोरिवली (पूर्व) येथे होणार आहेत. संपूर्ण उत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – शशी करंदीकर ९७६९९३९०४५