मुंबईसह राज्यात २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान थंडीची लाट, तुरळक पावसाची शक्यता
मुंबई दि.२७ :- सध्या राज्यात थंडीचा पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. फळपिकांसह रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे.
विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ईशान्येकडील वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. थंडीची ही लाट येत्या २ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.