मराठी भाषेचा मधुर स्वाद नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल कोश्यारी
मुंबई दि.२६ :- मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचा मधुर स्वाद नव्या पिढीपुढे पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण मंगळवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई पोलिसांकडून ५१ फरारी आरोपींना अटक
जन्मापासून लहान मुलांना इंग्रजी भाषा शिकविण्याचा पालकांचा अट्टाहास योग्य नाही. लहान मुलांना सुरुवातीला मातृभाषा आत्मसात करू द्यावी व त्यानंतर त्यांना इंग्रजीच नाही तर जर्मन, फ़्रेंच व इतर कुठलीही भाषा शिकणे शिकणे अवघड जाणार नाही. मराठी भाषा ही शिकण्यास सोपी असल्याचे आपण अनुभवातून सांगू शकतो असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधी परिसरात ‘स्वराज्यभूमी’ नामफलक नाही
‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या नाट्यकृतीमध्ये सातवाहन काळ, संत ज्ञानेश्वरांचा काळ, दक्षिण कर्नाटकातील राजांचा काळ येथपासून मराठी भाषेचा चांगला आढावा घेण्यात आला असून या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग शाळा व महाविद्यालयांमधून व्हावेत, असे आवाहनही राज्यपालांनी केले. यावेळी राज्यपालांनी नाटकासाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
रत्नागिरी येथे येत्या एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे समेलन
मधुरा वेलणकर, अभिजित साटम, डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांसह मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट विश्वातील कलाकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.