मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे
मुंबई दि.२६ :- एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबईतील सुशोभीकरणाच्या संदर्भात भाष्य केलं होतं. सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईत काय केलंय हेच कळत नाही. मुंबईतील खांबावर ज्या पद्धतीचे लाईट लावले आहेत, ते पाहता रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार हेच कळत नाही, असं राज ठाकरे उपरोधानं म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.
गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधी परिसरात ‘स्वराज्यभूमी’ नामफलक नाही
मुंबईत विद्युत खांबावर लावण्यात आलेली रोषणाई राज ठाकरे यांना डान्सबारसारखी दिसत असेल तर ही शोकांतिका आहे. ‘मुंबईला डान्सबार असं संबोधून राज ठाकरे यांनी मुंबईकरांचा अपमान केला आहे. त्यांनी समस्त मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.
दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे मुंबईच्या १२ प्रभागातील पाणीपुरवठा एक दिवस बंद
मुंबई डान्सबारसारखी दिसते बोलणार्या राज ठाकरे यांना बेस्टने वीज दरात १८ टक्के केलेली वाढ दिसली नाही किंवा ते त्यावर बोलले नाहीत. त्यावर बोलले असते तर नक्कीच आनंद झाला असता असं सांगत मुंबईला डान्सबारची उपमा देऊन राज ठाकरे यांनी मुंबईकरांचा अपमान केला आहे असं त्यांनी सांगितले.