ठळक बातम्या

लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई दि.२६ :- लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी येथे केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन -२०२३ चे आयोजन करण्यात आले होते.

मराठी भाषेचा मधुर स्वाद नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल कोश्यारी

त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले.

गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधी परिसरात ‘स्वराज्यभूमी’ नामफलक नाही

यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपीन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले, तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *