मुंबई आसपास संक्षिप्त
मुंबई विमानतळावर ३६ किलो सोने जप्त
मुंबई दि.२५ :- मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचे कंबरडे मोडले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानताळावरुन तब्बल ३६ किलो सोने जप्त केले असून या सोन्याची किंमत २१ कोटी रुपये आहे. या तस्करांकडून २० लाख रुपयांची रोख रक्कही जप्त करण्यात आली आहे. सोने वितळविणाऱ्या एका दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथे येत्या एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे समेलन
थकीत सेवाशुल्क भरण्यापासून रहिवाशांना दिलासा
मुंबई दि.२५ :- ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील पुनर्रचित इमारतींतील २० हजारांहून अधिक रहिवाशांना थकीत सेवाशुल्क भरण्यासंबंधी नोटीस बजावली होती. मात्र या रहिवाशांना दिलासा मिळाला असून थकीत रक्कम वसूल करण्याच्या नोटीसांना सरकारने स्थगिती दिली आहे. या नोटीसला स्थगिती देण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास सुरुवात येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट
नीला गोखले मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी
मुंबई दि.२५ :- वकील नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारच्या विधि व न्याय मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने १० जानेवारी रोजी गोखले यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. गोखले यांच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तीची संख्या ६६ झाली आहे.
दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे मुंबईच्या १२ प्रभागातील पाणीपुरवठा एक दिवस बंद
मंगळवारी मुंबईत एकाही करोना रुग्णाची नोंद नाही
मुंबई दि.२५ :- मुंबईमध्ये मंगळवारी एकही नवीन करोना रुग्णाची नोंद झाली नाही. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मुंबईमध्ये तब्बल ३४ महिन्यांनंतर २४ जानेवारी २०२३ रोजी करोना रुग्णांची शून्य नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतून करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात येत असून, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या संचलन सोहळ्यात महापालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक
अग्निशमन दल भरती- नऊ दिवसांत २० हजारांची उपस्थिती
मुंबई दि.२५ :- मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या नऊ दिवसात तब्बल २० हजारापर्यंत उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली. इतर मागासवर्गासाठीच्या जागांची भरती प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे तर खुल्या गटाच्या जागांसाठीची भरती प्रक्रिया चार दिवस चालणार आहे.
‘ईडी’ अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा – २५ लाख रुपये आणि ३ किलो सोने लुटले
४५१ किलो प्लास्टिकचा साठा जप्त
ठाणे दि.२५ :- ठाणे महापालिका क्षेत्रात प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने वागळे इस्टेट, उथळसर, कळवा व दिवा भागात कारवाई करून ४५१ किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.