प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त; शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’
मुंबई दि.२५ :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून हवाई सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला आहे.
रत्नागिरी येथे येत्या एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे समेलन
पोलिसांनी २६ जानेवारीला शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, छोटे विमान व इतर कोणतीही वस्तू उडविण्यास मज्जाव केला आहे. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव पॅरा- ग्लाइडर्स, पॅरा-मोटार, हँग ग्लाइडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राप्ट, हाॅट एअर बलून, लहान पाॅवर एअरक्राफ्ट यासारख्या हवाई उड्डाणाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.