देश आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र, मुंबईचा अभूतपूर्व विकास- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई दि.१९ :- देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. वांद्रे कुर्ला संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.
समाज घडवणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावरील मराठी चित्रपट निर्मितीस एक कोटी अनुदान
मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले”, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, देशभरात रेल्वेला आधुनिक बनविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. मुंबई उपनगरी सेवा आणि महाराष्ट्रातील रेल्वे जोडणीसाठही याचा फायदा होणार आहे आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील दुहेरीइंजिन सरकारला सामान्य माणसालाही त्याच आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे.
पोलीस भरतीसाठी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल
रेल्वे स्थानकांनाही विमानतळासारखे विकसित केले जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास केला जात असल्याचेही मोदी म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला? हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि वाहतूक कोंडत गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी यांच्या नेतृत्वामुळेच आम्हाला मिळाली आहे. जेव्हा मोदींना पाहतो, त्यांची भेट घेतो.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांच्या रक्तदाबाची चाचणी
तेव्हा माझ्या मनात एक पवित्र भावना निर्माण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी आहे, जे आम्हाला ऊर्जा देते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिले. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले.
पंतप्रधान मोदीं यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.