समाज घडवणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावरील मराठी चित्रपट निर्मितीस एक कोटी अनुदान
मुंबई दि.१९ :- महाराष्ट्रातील महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस आता पन्नास लाखांऐवजी एक कोटी रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी ही माहिती दिली.
पोलीस भरतीसाठी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल
अशा चित्रपटांसंदर्भात लवकरच नवीन धोरण तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. महान व्यक्तींवरील दूरचित्रवाणी मालिकांनाही अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांच्या रक्तदाबाची चाचणी
येत्या १५ दिवसात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनुदानाच्या विषयातील तपशील ठरविणे, धोरण विषयक सूचना घेणे वगैरे विषयांसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यासाठी समितीची फेररचना करण्यात येणार आहे. या समितीला कालबद्ध पद्धतीने अहवाल देण्यास सांगण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.