लोकसंख्या वाढल्याच्या कारणावरून प्रभाग संख्या कमी किंवा जास्त करता येणार नाही- महाधिवक्ता बिरेंद्र सराफ
मुंबई दि.१८ :- नगरसेवकांची संख्या किती असावी हे कायद्याने निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे, जनगणनेचा आधार घेऊन लोकसंख्या वाढल्याच्या कारणास्तव प्रभागसंख्या वाढवता किंवा कमी करता येणार नाही, असा दावा राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला.
मेलबर्न येथील मराठी नाटक ‘बंदिनी’ चे मुंबईत प्रयोग
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ही गैरसमजातून आणि कायद्याचा चुकीचा अर्थ लावून करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. महानगरपालिकेची प्रभागसंख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार- मुख्यमंत्री शिंदे
जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हा निर्णय बदलला व प्रभागसंख्या पूर्ववत करण्याचा नवा निर्णय घेतला. त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.