स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘समिधा’ कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली दि.१८ :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती कल्याण जिल्ह्याच्या वतीने येत्या २२ जानेवारी रोजी ‘समिधा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र लढा, संतपरंपरा, स्वातंत्र संग्रामातील योगदान आणि गेल्या ७५ वर्षातील गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ह.भ. प. बाळकृष्ण महाराज, गायक व संगीतकार मुकुंद मराठे, लेखक आणि ब्लॉगर रविंद्र गोळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मेलबर्न येथील मराठी नाटक ‘बंदिनी’ चे मुंबईत प्रयोग
नृत्य, नाट्य, संगीत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली(पूर्व) येथे कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
अधिक माहिती आणि विनामूल्य प्रवेशिकांसाठी संपर्क: सुवर्णा घोलप- 8425910007