राज्यात डिसेंबर महिन्यात ४६ हजार उमेदवारांना रोजगार- मंगलप्रभात लोढा
मुंबई दि.१८ :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४६ हजार १५४ नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला, अशी माहिती कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘समिधा’ कार्यक्रमाचे आयोजन
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नुकतेच चार महारोजगार मेळावे घेण्यात आले. विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख १ हजार ३३० इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली असल्याचे लोढा यांनी सांगितले.