मुंबईत २४ ते २७ जानेवारी दरम्यान कामगार कबड्डी स्पर्धा
मुंबई दि.१७ :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छेडा नगर परिसरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांची २६ वी आणि महिलांची २१ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग येथे येत्या २४ ते २७ जानेवारीदरम्यान होणार आहे. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला अशा तीन गटांत साखळी सामने खेळविण्यात येणार आहेत.
ठाणे- वांद्रे कुर्ला संकुल मार्गावरील प्रीमियम बस सेवेला उत्तम प्रतिसाद
इच्छुक संघांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी https://public.mlwb.in/public या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. २० जानेवारी ही नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.