ठळक बातम्या

डोंबिवलीत पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन

पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, प्रकट मुलाखत आदी कार्यक्रम

डोंबिवली दि.१७ :- पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे येत्या २१ ते २९ जानेवारी या कालावधीत पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे. शुक्रवार, २० जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, लेखक अच्युत गोडबोले, लेखिका उमा कुलकर्णी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत २४ ते २७ जानेवारी दरम्यान कामगार कबड्डी स्पर्धा

२१ ‘जानेवारीला अभिनेते महेश कोठारे यांची प्रकट मुलाखत, २२ जानेवारी या दिवशी ‘वाचन संस्कृती आणि कृतज्ञता’ या विषयावर प्रल्हाद पै यांचे व्याख्यान, २३ जानेवारीला वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

छेडा नगर परिसरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

लेखक प्रणव सखदेव यांची मुलाखत- २४ जानेवारी, माझ्या कवितेचा प्रवास- अशोक नायगावकर- २५ जानेवारी, स़ंत साहित्य- डॉ. अरुणा ढेरे- २६ जानेवारी, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची मुलाखत- २७ जानेवारी असे कार्यक्रम होणार आहेत.

ठाणे- वांद्रे कुर्ला संकुल मार्गावरील प्रीमियम बस सेवेला उत्तम प्रतिसाद

२८ जानेवारीला वैद्य परिक्षित शेवडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘ॲनालायझर न्यूज’चे सुशिल कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, २९ जानेवारी रोजी पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचा समारोप होणार आहे.  महाजन यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संध्याकाळी पाच तर अन्य सर्व कार्यक्रमांची वेळ संध्याकाळी सहा अशी आहे.

Dombivali ; घातक रसायनांचा साठा जप्त

पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या निमित्ताने काॅफी टेबल पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. विविध मान्यवरांचे ७५ लेख या पुस्तकात आहेत. पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे सर्व कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिक श्रोते, वाचक यांना विनामूल्य प्रवेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *