ठाणे- वांद्रे कुर्ला संकुल मार्गावरील प्रीमियम बस सेवेला उत्तम प्रतिसाद
मुंबई दि.१७ :- ठाणे -वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर चालविण्यात येणाऱ्या ‘बेस्ट’ प्रीमियम बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही वातानुकूलित प्रीमियम बस सेवा १२ डिसेंबरपासून ठाणे-वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल – वांद्रे स्थानकादरम्यान सुरू झाली.
Dombivali ; घातक रसायनांचा साठा जप्त
ठाणे-वांद्रे कुर्ला संकुलासाठी २०५ रुपये तर वांद्रे स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर एकेरी प्रवासासाठी ५० रुपये भाडे आहे. प्रवाशांना ‘चलो मोबाइल ॲप’वरून या बसमधील आसन आरक्षित करता येते.
मुंबईच्या समुद्रकिना-यावर मृतावस्थेतील डॉल्फिन
या बसचा मार्ग, अपेक्षित वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस सेवा असतील, याची माहिती ॲपवर मिळते. ठाणे -वांद्रे कुर्ला संकुल प्रीमियम बस सेवा सकाळी ७ ते सकाळी ८.३० या वेळेत दर अर्ध्या तासांनी, तर वांद्रे कुर्ला संकुल – ठाणे ही सेवा संध्याकाळी ५.३० ते ७ अशी दर अर्ध्या तासांनी उपलब्ध आहे.