Dombivali ; घातक रसायनांचा साठा जप्त
डोंबिवली दि.१७ :- खंबाळपाडा गावाच्या हद्दीत दहा लाख रुपये किमतीचा घातक रसायनांचा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात घातक रसायनांचा साठा करणा-या आणि हे रसायन खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या समुद्रकिना-यावर मृतावस्थेतील डॉल्फिन
खंबाळपाडा येथे एका टँकरमध्ये जलप्रदूषण करणारे घातक रसायन पिंपांमध्ये ओतून घेतले जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी येथे छापा टाकून हा साठा जप्त केला.