ठळक बातम्या

शाळा उडवून देण्याची धमकी देणा-या वक्तीला अटक

मुंबई दि.१२ :- वांद्रे – कुर्ला संकुल येथील धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला गुजरातमधून अटक केली. विक्रम सिंह झाला (३४) असे त्याचे नाव आहे.

टिळकनगर बालक मंदिर शाळेचा ‘भाजी मंडई’ उपक्रम

धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील रहिवासी असलेला विक्रमसिंह वाहनचालक आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघातात गेल्या वर्षी अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू

धमकीचा दूरध्वनी आपण प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला होता. पोलीस आपल्याला पकडतील, आपले छायाचित्र आणि नाव प्रसारमाध्यमांमध्ये छापून येईल. संपूर्ण देशात आपले नाव होईल, म्हणून हे कृत्य केल्याचे विक्रम सिंहने पोलिसांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *