ठळक बातम्या

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१२ :-मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, आणि त्याबाबत अहवाल सादर करावा,अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

शाळा उडवून देण्याची धमकी देणा-या वक्तीला अटक

‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतुक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतुक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

टिळकनगर बालक मंदिर शाळेचा ‘भाजी मंडई’ उपक्रम

मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *