टिळकनगर बालक मंदिर शाळेचा ‘भाजी मंडई’ उपक्रम
डोंबिवली दि.१२ :- शैक्षणिक ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी डोंबिवली येथील टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित टिळक नगर बालक मंदिरातर्फे ‘भाजी मंडई’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघातात गेल्या वर्षी अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू
हा उपक्रम टिळक नगर बालक मंदिरात पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. बालक मंदिराच्या विभाग प्रमुख स्वाती कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. भाजी मंडईच्या उपक्रमास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही भेट दिली.