नववर्षाचे स्वागत करणा-या मुंबईकरांसाठी उद्या रात्री बेस्ट उपक्रमाच्या जादा बसगाड्या
मुंबई दि.३० :- नववर्षाचे स्वागत करणा-या मुंबईकरांसाठी उद्या (३१ डिसेंब) रात्री बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईकरांना बेस्ट बसमधून प्रवास करता यावा म्हणून ५० अतिरिक्त बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आहे. या बसमधून मुंबईकरांना
सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
समुद्रकिनाऱ्याची सफर करता येणार आहे. नववर्ष स्वागतासाठी रात्री गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनारे, चौपाट्या येथे फिरावयास जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
महापालिका जलतरण तलाव सदस्यता त्रैमासिक व मासिक स्वरुपातही मिळणार
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्थानक पूर्व येथे वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.