बँकेतील लॉकरच्या कराराचे नुतनीकरण येत्या १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करा
भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदेश
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२६ :- खातेदारांनी बँकेतील लॉकरच्या कराराचे नुतनीकरण येत्या १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ज्या ग्राहकांचे बँकेमध्ये लॉकर आहेत, त्यांनी नूतनीकरणावेळी पात्रतेचा पुरावा देणे बंधनकारक आहे.
बँकांनी ग्राहकांच्या माहितीसाठी त्यांच्या शाखानिहाय रिक्त लॉकर्सची यादी तसेच कोअर बँकिंग प्रणालीतील प्रतीक्षा यादी ठेवणे अनिवार्य केल्याचे ‘आरबीआय’ च्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.