महापालिका केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळ शाळांच्या नर्सरी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया
मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई), आयसीएसई आणि आयबी, केंब्रीज आयजीसीएसई मंडळाच्या शाळांमधील नर्सरीसाठीची प्रवेश प्रक्रिया येत्या ४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
४ ते २२ जानेवारी या कालावधीत केवळ पूर्वप्राथमिकच्या जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) पालिकेच्या शिक्षण विभागाने पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसईच्या ११ व आयसीएसईची एक शाळा सुरु केली आहे. माहीमच्या वूलन मिल शाळेत आयसीएसईची शाळा सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेची पहिली आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची म्हणजेच ‘आय.बी.’ शाळा विलेपार्ले येथील दीक्षित रस्त्यावरील महापालिकेच्या शाळेत यावर्षी सुरू झाली. केंब्रीज मंडळाशी संलग्न ‘आय.जी.सी.एस.ई.’ मंडळाची शाळा माटुंगा येथील लक्ष्मीनारायण रस्ता येथील एल के वाघजी शाळेत सुरू झाली आहे.