राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत झरीन, लवलिनाअंतिम फेरीत
वृत्तसंस्था
भोपाळ दि.२६ :- भोपाळ येथे सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विद्यमान विश्वविजेती निखत झरीन आणि टोक्यो ऑलिंपिक्स कास्य पदक विजेती लवलिना बोर्गोहाईन आपापल्या श्रेणींमध्ये अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.
रेल्वे विभागाच्या आठ मुष्टियोद्धा देखील अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. यात २०१९ मधील विश्व रौप्य पदक विजेती मंजू राणी, २०१७ ची विश्व युवा अजिंक्यवीर ज्योती गुलिया यांचा समावेश आहे.