ठळक बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाची रामदास आठवले यांच्याकडून पाहणी 

पुतळ्याच्या प्रतिकृतीला गेल्या दीड वर्षापासून मान्यता नाही
महाविकास आघाडी शासनाचे दुर्लक्ष

मुंबई दि.०२ :- दादर (पश्चिम) येथे इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेचारशे फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा :- सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

या पुतळ्याच्या तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता देण्यासाठी राज्यशासनाने तातडीने एका समितीची स्थापना करावी आणि सूचना मागवून पुतळ्याच्या प्रतिकृतीला मान्यता द्यावी, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :- मुंबईत उद्या महारोजगार मेळावा रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध

डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक कामाचा खर्च १ हजार ८० कोटी रुपये इतका असून  हा खर्च समाज कल्याण विभागाऐवजी ‘एमएमआरडीए’नेच करावा या आणि स्मारक कामाबाबतच्या अन्य मागण्यांसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही आठवले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भीम अनुयायांसाठी उभारण्यात आलेल्या मंडप व इतर सोयीसुविधांच्या तयारीच्या कामाची पाहणीही आठवले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *