मुंबईत उद्या महारोजगार मेळावा रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध
मुंबई दि.०२ :- मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे उद्या (३ डिसेंबर) पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव येथे सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.
हेही वाचा :- ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ
मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मेळाव्यात मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
हेही वाचा :- सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.