नागपूर समृद्धी महामार्ग – नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी ९०० रुपये टोल
मुंबई दि.०२ :- मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी अशा ५२० किलोमीटरच्या पाच तासांच्या प्रवासासाठी ९०० रुपये इतका टोल भरावा लागणार आहे. या मार्गावर १९ टोल नाके असतील. नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.