स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखांमध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकारांत वाढ

मुंबई दि.१७ :- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखांमध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकारांत २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ वर्षामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशभरात स्टेट बँकेत सायबर फसवणुकीचे २१ प्रकरण घडले. त्यात बँकेची २.७४ कोटींनी फसवणूक झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव अवघ्या ७ तासांत – वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी

२०२१-२२ मध्ये येथे ३२९ प्रकरणांमध्ये बँकेची ४.४५ कोटी रुपयांनी तर २०२२-२३ या वर्षात ७२२ प्रकरणांमध्ये तब्बल ९.२३ कोटींनी फसवणूक झाली. त्यातही सर्वाधिक सायबर फसवणूक ‘इंटरनेट बँकिंग’मध्ये झाली.

नाटक व्यवसाय आणि नाट्यगृहांची सध्याची अवस्था यात नक्कीच बदल होतील- प्रशांत दामले

२०२०-२१ मध्ये ४ प्रकरणात २.६४ कोटी, २०२१-२२ मध्ये २२४ प्रकरणांत ३.९१ कोटी, २०२२-२३ मध्ये ३३२ प्रकरणांत ६.२४ कोटींनी फसवणूक झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले. स्टेट बँकेचे केंद्रीय जन माहिती अधिकारी व उपमहाव्यवस्थापक ईश्वरचन्द्र शाहू यांनी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.