शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाने
मुंबई दि.०७ :- कल्याण शिळफाटा रस्त्यावर पलावा चौकातील उड्डाण पुलावरील गर्डर बसविण्यासाठी येत्या ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
टाटा रुग्णालयाचा ‘ महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ उपक्रम
गर्डर बसविण्याच्या कामाच्या वेळी देसाई खाडीपूल ते पलावा चौकादरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिळफाट्याकडून कल्याण डोंबिवलीकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळोजा मार्गे तर काही वाहने मुंब्रा बाह्यवळण रस्त्याने कळवा, नाशिक महामार्ग, भिवंडी दिशेने वळविण्यात येणार आहेत.
नाशिक, कल्याण, डोंबिवलीहून येणारी वाहने भिवंडी बाह्य वळण रस्ता, कळवा मुंब्रा मार्गे किंवा काटई नाका येथून बदलापूर पाईपलाईन रस्त्याने खोणी तळोजा मार्गे वळविण्यात येणार आहेत.