‘मातोश्री’त आढळला विषारी नाग!
मुंबई दि.०७ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ वर आज कोब्रा जातीचा विषारी नाग आढळून आला. वन्यजीव संरक्षण आणि सर्पमित्रांनी या नागाला पकडले आणि जंगलात सोडून दिले. निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना नाग दिसल्यानंतर त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. पाण्याच्या टाकीमागे हा नाग लपला होता.
टाटा रुग्णालयाचा ‘ महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ उपक्रम