टाटा रुग्णालयाचा ‘ महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ उपक्रम
मुंबई दि.०७ :- टाटा रुग्णालयातून सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी डॉक्टर) आता ‘महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ म्हणून काम करणार आहेत. हे डॉक्टर सेवा देत असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी जिल्हा रुग्णालय किंवा आरोग्य केंद्रामध्ये महिन्यातून एकदा/ दोनदा भेट देऊन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाकडून दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध
कॅन्सर एपिडेमिओलॉजी सेंटरचे उपसंचालक डॉ पंकज चतुर्वेदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कर्करोग रुग्ण आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरुवारी ऑनलाइन जाहीर होणार
गरजेनुसार उपचारानुसार त्यांच्यावर केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि प्राथमिक स्वरपातील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. मुख कर्करोग झालेला रुग्ण आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करणार असून पुढील उपचारासाठी त्यांना टाटा रुग्णालयामध्ये पाठविण्यात येणार आहे.