एडलवाइज कंपनीच्या अधिकाऱ्यांना उद्या खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
मुंबई दि.०७ :- कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्याप्रकरणी एडलवाइज फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि प्रशासक यांना उद्या (मंगळवार) खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाने
देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओ गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संदर्भात देसाई यांच्या पत्नीने एडलवाइजकंपनी आणि प्रशासकां विरोधात मानसिक त्रास दिल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कंपनीचे अधिकारी आणि प्रशासक यांनी कर्जाची कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहावे, असे सांगण्यात आले आहे. देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी पाच तपास पथके तयार केली आहेत.