नाटक व्यवसाय आणि नाट्यगृहांची सध्याची अवस्था यात नक्कीच बदल होतील- प्रशांत दामले
मुंबई दि.१७ :- सध्याची नाट्यगृहांची अवस्था, नाटक व्यवसाय यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतील, असा विश्वास अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
व्यास क्रिएशन्स्तर्फे तीन दिवसीय पुस्तक आदान प्रदान महोत्सव
या आधी काय झाले ते उगाळत न बसता आम्ही नव्या जोमाने कामाला लागणार आहोत. अध्यक्ष नव्हतो तेव्हाही राज्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत माझ्या सूचना, निरिक्षण संबंधितांच्या निदर्शनास आणून देत होतो, असेही दामले यांनी सांगितले.
‘जय जय स्वामी समर्थ मालिके’त स्वामीसुत पर्वाची सुरुवात – विकास पाटील साकारणार स्वामीसुत
जे काही मतभेद होते ते निवडणुकीपुरतेच होते. आता ते संपले असून कोणतेही गटतट नाही. आम्ही साठजण एकत्र मिळून काम करणार आहोत, अशी ग्वाहीही दामले यांनी दिली.